Krushi News : शालेय पुस्तकात कृषी चा हा विषय शिकवला जाणार, सरकारी ची मोठी बातमी..

This subject of agriculture is taught in school books

कृषी बातमी : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी नुकत्याच एका शासन आयोगात सांगितले की, शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे ज्याचा अनेक रित्या फायदा व्हायला मिळणार आहे जसे की शेती व्यवसायाला चालना मिळेल व तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेती व्यवसायासाठी आवड निर्माण होईल

खूप दिवसापासून अनेक शेतकऱ्यांकडून व व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती की कृषी विषय हा शालेय अभ्यासक्रमात शिकवला जावा या मागणीचा विचार करून शिक्षण आयोगाने कृषी विषय शालेय अभ्यासक्रमात टाकण्याचा निर्णय घेतला आहे परंतु कशाप्रकारे कृषी विषय हा शालेय पुस्तकात द्यायचं त्याचा आराखडा कसा असला पाहिजे आणि शिक्षण आयोगातील पदाधिकारी काम करत आहेत व यामध्ये शिक्षण आयोगाने कृषी विभागाचे देखील मदत घेतली आहे ते काम संपूर्णपणे पार पडल्यानंतर आपल्याला कृषी विषय हा शालेय अभ्यासात पाहिला मिळेल

जसे की आपण पाहतो की शालेय शिक्षणामध्ये केंद्र सरकारने शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात क्रीडा,साहित्य,कला किंवा व्यावसायिक शिक्षणात जास्त प्रमाणे भर दिली आहे त्यामुळे आता केंद्र सरकार कृषी शिक्षण देखील शालेय पुस्तकांमार्फत विद्यार्थ्यांना देणार आहे, त्यामुळे शेतीविषयक ज्ञानाचा फायदा हा ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे खास करून पाहिले गेले तर शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा लाभ खूप मोठ्या प्रमाणात होईल व शेती व्यवसाय वाढण्यास देखील मदत होईल

शालेय पुस्तकांमध्ये कृषी विषयाचा अभ्यासक्रम हा येत्या पुढील वर्षापासून आपल्याला पाहायला मिळेल नवीन शिक्षण व्यवस्था ही पुढील वर्षापासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमात लागू होणार आहे त्यामुळे पुढील वर्षात कृषी व्यवसाय क्रीडा कला असे विषय शालेय पाठ्यपुस्तकात दिले जाणार आहेत ज्यामुळे समाजाचे व देशाची प्रगती होण्यास मदत होईल.

Leave a Comment