टोमॅटो लागवड संपूर्ण माहिती  | tomato lagwad

शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकरी टोमॅटो लागवड हे नगदी पीक घेण्यास सुरुवात करतात परंतु त्यांना लागवडीची योग्य माहिती न असल्या कारणामुळे ते योग्य प्रकारची पाहिजे तशी लागवड करत नाही आणि महाराष्ट्र मध्ये जर आपण पाहिलं तर सातारा,सांगली,सोलापूर या भागात खूप जास्त प्रमाणात टोमॅटो लागवड केली जाते व यामधून त्या ठिकाणचे शेतकरी उत्पन्न देखील चांगल्या प्रकारचे कमावतात त्यामुळे टोमॅटो हे पीक एक प्रमुख पीक म्हणून देखील महाराष्ट्रमध्ये ओळखलं जाते. आणि राहिला विषय बाजार भावाचा तर टोमॅटो या पिकापासून असंख्य प्रकारचे प्रॉडक्ट हे बाजारामध्ये विक्री केले जातात त्यामुळे टोमॅटोचा बाजारभाव देखील शेतकऱ्याला प्रत्येक सीझनला चांगला मिळत असतो.

टोमॅटो लागवडीसाठी रान कसे तयार करावे

  • शेतकरी मित्रांनो टोमॅटो हे पीक तीन हंगामी पीक असल्यामुळे ते आपण एका वर्षात तिन्ही हंगामात टोमॅटोची लागवड करू शकतो. उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यात पहिली लागवड केली जाते त्यानंतर पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत दुसरी लागवड केली जाते आणि त्यानंतर शेवटची लागवड ही ऑक्टोंबर ते डिसेंबर या महिन्याच्या कालावधीत केली जाते. जवळपास आपण वर्षातले बाराही महिने आपण या पिकाची लागवड करू शकतो.
  • यानंतर टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी किंवा उत्पादनासाठी मध्यम व हलक्या स्वरूपाची जमीन ही लागते. जर आपल्या शेतातील जमीन हलक्या स्वरूपाची असेल तर टोमॅटो या फळाची साईज आपल्याला चांगली पाहायला भेटते. परंतु आपल्या जमिनीत जर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असेल तर आपल्याला पिकाला वेळोवेळी वारंवार पाणी द्यावे लागते आणि त्याचबरोबर जमिनीला गरजेचे असणारे अन्नद्रव्य म्हणजेच खते ही आपल्याला पुरवावी लागतात
  • प्रथम आपल्याला जमिनीमध्ये उभ्या व आडव्या प्रकारची ट्रॅक्टरने नांगरट करून घ्यायचे आहे किंवा कुळवणी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जमिनीची योग्य प्रकारे मशागत ही करून घ्यायची आहे जेणेकरून आधी घेतलेल्या पिकाचे अवशेष परत जमिनीत आढळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे
  • यानंतर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये गांडूळ खत हे टाकायचं आहे गांडूळ खतांमध्ये असणारे जैविक घटक आणि खनिजे आपल्या जमिनीचा पोच आणि सुपीकता वाढवतात आणि हा  गांडूळ खत प्रकल्प आपण घरी देखील करू शकतो ज्यामुळे आपल्याला पीक घेण्यास मदत मिळते.
  • जेव्हा आपण रान तयार करणार तेव्हा आपल्याला दोन बेड मधील अंतर हे चार फुटापासून ते पाच फुटापर्यंत इतकं ठेवायचं आहे.
  • त्यानंतर दोन रोपांमधील अंतर जे असणार आहे ते दीड ते दोन फुट इतके आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून रोपाला वाढण्यास जागा मिळेल व सूर्य प्रकाश देखील चांगला मिळेल.
  • यानंतर आपल्याला त्याच रोपांना पाणी देण्यासाठी मल्चिंग किंवा ठिबक सिंचनाचा वापर करायचा आहे.
  • लागवडीनंतर आपल्याला रोपांवरती वेगवेगळ्या किडींचे अटॅक आपल्याला पाहायला भेटतात त्यामुळे आपण बाजारी मध्ये भेटणारे निळे पिवळे चिकट सापळे किंवा कामगंध आपल्याला त्या रोपांना लावायचे आहे.

टोमॅटो रोपांची निवड कशी करावी

टोमॅटो पीक लागवडीसाठी प्रत्येक हंगामात हंगामानुसार वेगवेगळी रोप ही आपल्याला बाजारामध्ये मिळतात.

  • महाराष्ट्र कृषी तज्ञांच्या मते आपल्याला जर हंगामानुसार रोप निवडायचे असेल तर आपण उन्हाळी टोमॅटो लागवड करत असाल तर तुम्ही 1057,6242,साई 25,2182 अशी वरील टोमॅटोची बियाणे तुम्ही या हंगामात लावू शकता
  • यानंतर जर तुम्ही पावसाळ्यामध्ये लागवड करत असाल तर तुम्ही नेत्रा,अधिक,कौस्तुभ,साई 22 अशी वरील बियाणे तुम्ही या हंगामात लावू शकता.
  • आणि यानंतर जर तुम्ही हिवाळी हंगामातील लागवड करत असाल तर विरांग,भूमि 41 अशी बियाणे घेऊन त्याची लागवड करू शकता.

शेतकरी मित्रांनो लागवडीसाठी रोपेही किमान 22 ते 25 दिवसाची असायला हवीत त्यानंतर तुम्ही लागवड करा

टोमॅटो पीक खते व व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो या पिकासाठी आपल्याला खत व्यवस्थापन हे लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर अशा दोन पद्धतीने करायचा आहे

  • लागवडी पूर्वी आपण पाहिल तर जेव्हा आपण जमिनीची मशागत करतो तेव्हा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये शेणखत किंवा गांडूळ खत हे टाकून घ्यायचं आहे कारण की अशी जैविक खते जर आपण वापरली तर पुढे आपल्याला रासायनिक खतांचे प्रमाण हे कमी लागणार आहे
  • यानंतर आपल्याला लागवडीपूर्वी जमिनीला बेसल डोस द्यायचा आहे बेसल डोस हा आपण 2 पिशव्या DAP ,एक पिशवी MOP,25 किलो माइक्रो नुट्रिइयन आणि दोन पिशवी निम्बूली या खतांचा आपल्याला वापर करायचा आहे
  • यानंतर आपल्याला जमिनीला पाणी देऊन रोपांची लागवडी करायची आहे रोपे लागवड करून झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी आपल्याला विद्राव्य खतांची आळवणी करायची आहे
  • पहिल्या आळवणी मध्ये आपण 1261 दोन किलो,potentium humate अर्दा किलो,Mancozer हे बुर्शी नाशक आणि थायो मिथाइल हे किटक नाशक, आपल्याला वापरायचे आहे. शेतकरी मित्रांनो वरील आळवणी खताचे प्रमाण हे एकेरी आहे त्यामुळे पहिल्या अळवणीमध्ये तुम्हीच पूरक युक्त खतांचा हा वापर करावा, कारण की या खतामुळे रोपे जमिनीमध्ये चांगली सेट होण्यास आणि त्या रोपांची मुलांची चांगली वाढ होण्यास मदत होते.
  • यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी हे रोपे जमिनीमध्ये चांगली सेट झाल्यानंतर आपल्याला रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आणि तसेच मुलांच्या वाढीसाठी आपल्याला त्या रोपांवर अजून एक फवारणी घ्यायची आहे आणि आळवणी करायची आहे.
  • फवारणीसाठी तुम्ही प्रत्येक एका पंपा मागे 70 ग्रॅम या हिशोबाने 19:19:19 प्रति पंप 20 ग्रॅम या हिशोबन Seweed Extract आणि प्रति पंप 15 ग्रॅम याप्रमाणे माइक्रो न्यूट्रियंट घ्यायचा आहे आणि या सर्वांची फवारणी आपल्याला आपल्या पिकावरती करायचे आहे.
  • शेतकरी मित्रांनो फवारणी केल्यानंतर आता आपल्याला पुढच्या अळवणीसाठी प्रति एकरी 3 किलो 19:19:19 आणि अन्नद्रव्याचे व्यवस्थापन चांगलं होऊ यासाठी ORGANIC NPK दोन खतांचा डोस द्यायचा आहे आणि वरील आळवणी आणि फवारणी हे आपल्याला झाडांच्या वाढीसाठी करायची आहे

व्यवस्थापन

  • यानंतर आपल्याला 30 ते 40 दिवसानंतर एक फवारणी करायची आहे त्यासाठी आपल्याला 12:61:00 प्रति पंप 80 ग्रॅम, चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट 15 ग्रॅम,सिलिकॉन 15 ग्रॅम या सर्वांचे आपल्याला 30 ते 40 दिवसानंतर पिकांवरती फवारणी करायची आहे
  • त्यानंतर आपल्याला आळवणी करण्यासाठी 13:40:13 हे तीन किलो वापरायचा आहे या खात्यामुळे झाडाची ही रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढते आणि झाडाची मुळे आणि ताकद देखील वाढते.
  • यानंतर पुढे 45 ते 60 दिवसानंतर आपल्याला पुन्हा एक फवारणी व आळवणी करायची आहे त्यासाठी आपल्याला फवारणी मध्ये 13:0:45 80 ग्रॅम, कॅल्शियम प्लस बोरॉन 15 ग्रॅम, एंट्रोकोन हे बुरशीनाशक आणि बेनविया हे कीटकनाशक यांचे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. यानंतर आपण आळवनीसाठी एकेरी 3 किलो 0:52:34,250 ग्रॅम चिलेटेड, मायक्रो न्यूट्रिएंट, तसेच 20% बोरॉन 200 ग्रॅम यांची आपल्याला आळवणी करायची आहे.
  • यानंतर 60 ते 80 दिवसांच्या फवारणीसाठी व आळवणीसाठी आपल्याला 0.52.34 80 ग्राम प्रति पंप 20 टक्के बोरॉन 15 ग्रॅम पती पंप, सिविड Extract 15 ग्राम प्रति पंप यांचे फवारणी आपल्याला करून घ्यायचे आहे त्यानंतर आळवणीसाठी आपल्याला एकेरी 3 किलो 0:52:34,बोरॉन 20% 250 ग्रॅम,अमिनोऍसिड युक्त,बायोस्टीम्यूलन्ट अशी आळवण आपल्याला करायची आहे.
  • यानंतर पुन्हा आपल्याला 80 ते 100 दिवसानंतर फवारणी व आळवणी करायची आहे. फवारणी मध्ये आपल्याला 13:0:45 80 ग्रॅम प्रति पंप, कॅल्शियम प्लस बोरॉन 15 ग्रॅम प्रति पंप, सिव्हिड Extract 15 ग्राम प्रति पंप यांची आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर आळवण्यासाठी आपण एकेरी तीन किलो 13:0:45 , अडीचशे ग्रॅम चिलटेड मायक्रोन्यूट्रिएंट , अमिनो ऍसिडिटी टॉनिक हे वरील सर्व अळवणीसाठी आपल्याला वापरायचे आहे.
  • यानंतर आपल्याला शेवटची 100 ते 120 दिवसाची फवारणी आळवणी करायची आहे फवारणी मध्ये आपल्याला 0:0:50 ग्राम प्रति पंप, त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट 15 ग्रॅम प्रति पंप असे फवारून घ्यायचे आहे आणि यानंतर अळवणीसाठी आपण 3 किलो 0:0:50, 250 ग्रॅम मायक्रो न्यूट्रिएंट एक बायोस्टीमूलंट अशी आळवणी आपल्याला करायची आहे तर वरील जेवढे पण फवारण्या व आडवणे आहेत त्या संपूर्ण आपल्याला 120 दिवसांच्या कालावधीमध्ये करायच्या आहेत.

FAQ

टोमॅटो वाढण्यास किती वेळ लागतो

लागवन पासून ते काढणीपर्यंतचा जर आपण काळ पाहिला तर टोमॅटोच्या रोपाच्या वाढीसाठी 50 ते 80 दिवसांचा कालावधी लागतो

उन्हाळी टोमॅटो जाती

खालील 1057,6242,साई 25,2182 अश्या टोमॅटो जाती तुम्ही उन्हाळी लागवडीसाठी लाऊ शकता 

पावसाळी टोमॅटो जाती

खालील नेत्रा,अधिक,कौस्तुभ,साई 22 अश्या टोमॅटो जाती तुम्ही पावसाळी लागवडीसाठी लाऊ शकता.

हिवाळी टोमॅटो जाती

खालील विरांग आणि भूमि 41 अश्या टोमॅटो जाती तुम्ही हिवाळी लागवडीसाठी लाऊ शकता

Leave a Comment