टॉप 05 ग्रामीण भागातील शेती पूरक व्यवसाय 

शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला व बेरोजगार तरुणाला घरची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी व्यवसाय करण्याची एक इच्छा असते परंतु एक व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर प्रत्येकापुढे भांडवलाची अडचण येते परंतु त्याच बरोबर असा कोणता व्यवसाय आपण केला पाहिजे जो आपल्या ग्रामीण भागात चालेल व त्यापासून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल याचा आपण विचार कधीच करत नाही.त्यामुळे बऱ्याच युवकांचे व्यवसाय हे चालत नाही व काही कालांतराने ते व्यवसाय बंद पडतात तर हे टाळण्यासाठी आज आपण अशे पाच व्यवसाय पाहणार आहोत की जे व्यवसाय अगदी शेतीपूरक व्यवसाय आहेत आणि या व्यवसायातून तुम्ही चांगले उत्पन्न देखील काढू शकता तर खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचा त्यामध्ये तुम्हाला व्यवसायाबद्दल माहिती दिली जाईल.

top 05 buisness idea for village in marathi

शेळी पालन व्यवसाय

शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागात व्यवसाय करायचे म्हटले तर सर्वोत्कृष्ट व्यवसाय म्हणजे शेळीपालन व्यवसाय एक प्रकारे म्हटले तर शेतकऱ्याला आर्थिक परिस्थितीत सावरण्याचा व्यवसाय हा व्यवसाय आहे.

  •  मित्रांनो शेळी पालन हा व्यवसाय दोन प्रकारे केला जातो एक म्हणजे मोकळ्या रानावरती आणि दुसरं म्हणजे बंदिस्त शेळीपालन जर तुम्ही ग्रामीण भागातील डोंगराळ किंवा माळरान बागातील असाल तर तुम्ही शेळी पालन व्यवसाय माळरानावरती करू शकता परंतु जर तुम्ही शहरी भागातील असेल तर तुम्ही शेळी पालन व्यवसाय हा एक बंदिस्त शेडमध्ये देखील करू शकता.
  • शेळीपालन व्यवसाय शेती पूरक व्यवसाय म्हणून का ओळखला जातो तर मित्रांनो शेळी पालन व्यवसायात खर्च हा शेतकऱ्यांसाठी कमी येतो म्हणजे शेळीच्या खाद्यावरती जो खर्च असतो तो खर्च आपला कमी असतो कारण की जेव्हा आपण शेतामध्ये एखादं पीक घेत असतो किंवा आपल्या शेतामध्ये झाडे असतात त्याचा वापर आपण या व्यवसायासाठी खाद्यामध्ये करू शकतो. आणि हा खर्च कमी झाल्याने आपल्या उत्पन्नात वाढ होते.

शेळी पालन योजना 

  • सुरुवातीला शेळी पालन व्यवसाय करायचा म्हटलं तर अनेक गरीब कुटुंबातील सदस्यांना पैशाची आर्थिक अडचण येते. त्यामुळे राज्य शासन नियमित शेळी पालन व्यवसायासाठी अनेक योजना राबवत असते त्यामध्ये शेतकऱ्याला 50 ते 75 टक्के अनुदान दिले जाते ज्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला घेता येतो. कधीकधी तर सरकार शेतकऱ्यासाठी शेळी पालन योजना राबवून त्यामध्ये पाच शेळ्या एक बोकड किंवा दहा शेळ्या एक बोकड यासाठी अनुदान देत असते याची सविस्तर चौकशी तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन पशुवर्धन अधिकाऱ्याकडे जाऊन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता.

आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेळीपालन हा व्यवसाय एका शेळी पासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही (एक शेळी किती नफा व तोटा देईल) हा लेख वाचू शकता यामध्ये संपूर्णपणे माहिती दिली आहे.

कोंबडी पालन व्यवसाय

शेतकरी मित्रांनो शेती पूरक व्यवसायामधील दुसरा व्यवसाय म्हणजे कुकुट पालन व्यवसाय हा देखील शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. आपण पाहतो की व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर अनेक व्यवसाय असे असतात की त्यासाठी आपल्याला काही कालावधी प्रशिक्षण घ्यावे लागते परंतु कोंबडी पालन व्यवसायात कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही तरी आपण हा व्यवसाय चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो व त्यामधून उत्पन्न काढू शकतो. आणि जर तुम्ही ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबातील असाल आणि तुमच्याकडे एखादा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशे भांडवल नसेल तर तुम्ही या व्यवसायापासून सुरुवात करू शकता.

  •  आपण जर गावरान कोंबडी किंवा बॉयलर कोंबडी चे बाजार भाव पाहिले तर दिवसेंदिवस बाजार भाव हे वाढत चालले आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी या व्यवसायाला मागणी देखील वाढत चालली आहे त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही हा व्यवसाय शेतीला धरून सुरू करू शकता.

कुकुट पालन पालन योजना

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि जर तुमच्याकडे भांडवलासाठी पैसे नसतील तर तुम्ही सरकारद्वारे राबवली जाणारी नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज करुण ज्यामधून तुम्हाला 50 ते 75 टक्के अनुदान हे कुक्कुटपालन योजनेमार्फत दिले जाते यामध्ये तुम्हाला 1000 पक्षी हे दिले जातात यासंबंधीत अधिक चौकशी तुम्ही तुमच्या पंचायत समितीत पशु अधिकार्‍याकडे जाऊन करू शकता.

दुध व्यवसाय

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा जिवाभावाचा व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय जो पूर्वीपासून एक महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. परंतु आत्ता काही आर्थिक परिस्थितीमुळे हा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याला करणे शक्य नाही कारण की या व्यवसायासाठी खर्च हा खूप जास्त असतो परंतु त्यामधून उत्पादन देखील चांगले आपल्याला प्राप्त होते.

  • दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे आपल्याला या व्यवसायासाठी फक्त भांडवलासाठी जास्त पैसे लागतात म्हणजेच की सुरुवातीला आपल्याला दुधाची गाय किंवा म्हैस घेण्यासाठी 70 ते 80 हजार रुपये लागतात जे की खूप मोठे रक्कम आहे त्यामुळे हा व्यवसाय खूप कमी शेतकरी करतात परंतु या व्यवसायातून तुम्हाला दूध विक्री करून उत्पन्न हे चांगली मिळते.

दुग्ध व्यवसाय योजना

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गाय व म्हैस पालन करून दूध व्यवसाय करायचा असेल आणि जर तुमच्याकडे काय म्हैस घेण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या ( नाविन्यपूर्ण दुग्ध व्यवसाय योजना) या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला 50 ते 75 टक्के अनुदान हे सरकार देते या संबंधित तुम्ही अधिक माहिती तुमच्या जवळच्या पंचायत समितीत जाऊन शुधिकार्‍याकडून घेऊ शकता व अर्ज करू शकता.

तेल बियाण्यांपासून तेल काढणे व्यवसाय

शेतकरी मित्रांनो तेल बियांपासून तेल काढणे हा व्यवसाय ग्रामीण भागातील एक योग्य व्यवसाय आहे कारण हा व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये तेलबियांपासून म्हणजेच की शेंगदाणे,नारळ यांच्या मधून बिना भेसळ केलेलं तेल व पेंड काढणे व ते विकणे. या व्यवसायासंबंधीत अधिक माहितीसाठी तुम्ही हा लेख वाचू शकता (Oil मिल प्लांट व्यवसाय )

वांगी लागवड व्यवसाय

शेतकरी मित्रांनो वांगी लागवड हा व्यवसाय अगदी शेतीपूरक व्यवसाय आहे कारण की या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त शेतजमीन असणे आवश्यक नाही जर तुमच्याकडे एक गुंठा जरी जमीन असेल तरी तुम्ही त्यामधून चांगले पुरेसे उत्पन्न हे काढू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर वांग हे पीक बारा महिने चालणारे पीक आहे त्यामुळे या पिकाचा फायदा तुम्हाला बारा महिनेही होणार आहे या संबंधित या पिकासाठी खर्च व त्यातून उत्पादन किती होते हे पाहण्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा. ( वांगी लागवड व्यवसाय )

Leave a Comment