सरकारी कार्ड : भारत सरकारकडून दिले जाणारे पाच अशे कार्ड आज आपण पाहणार आहोत जे तुमच्या जवळ असायलाच पाहिजे, हे कार्ड तुमच्याजवळ असल्याने तुम्हाला असंख्य सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच हे कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करायचा या संबंधित संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.
KCC कार्ड :
KCC (किसान क्रेडिट कार्ड) किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी बनवले जाणारे कार्ड आहे जे कार्ड बँकेत मार्फत बनवले जाते या कार्डचा फायदा असा की शेतकऱ्यांना कधी औषधांसाठी किंवा शेतीच्या बियाण्यांसाठी बँकेमार्फत थोडक्यात कर्ज हे दिले जाते जे कर्ज कमी व्याज दारावरती दिले जाते, अगदी 3 लाख रुपये लोन हे फक्त 4% टक्के व्याजदरावर शेतकऱ्याला मिळते ज्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत प्राप्त होते
E- sharm card :
ई श्रम कार्ड हे सरकारने देशातील कामगारांसाठी बनवलेले एक कार्ड आहे ज्याचा फायदा अनेक कामगारांना घेता येतो, देशातील असे सगळे कामगार ज्यांची नोंदणी कुठेच नसते त्यांना हे ई श्रम कार्ड दिले जाते व या कार्डच्या मदतीने कामगारांसाठी अनेक योजना देखील राबवल्या जातात या योजनेचा त्यांना फायदा होतो, जेव्हा पण एखादी नैसर्गिक आपत्ती एखाद्या राज्यात येते तेव्हा त्या राज्यातील कामगारांसाठी काही ठराविक रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवली जाते ती रक्कम प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे हे इस ई श्रम कार्ड असणे खूप गरजेचे आहे
आयुष्यमान भारत कार्ड
आयुष्यमान भारत कार्ड हे भारतातील अशा नागरिकांसाठी बनवले जाणारे कार्ड आहे, की जे नागरिक आर्थिक दृष्ट्या कुमकुवत आहेत ज्यांना सरकारी दवाखान्यात योग्य उपचार मिळत नाही व त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यायचे असतात तर त्यासाठी हे आयुष्यमान कार्ड बनवण्यात आले आहे या कार्डच्या मदतीने आपण खाजगी रुग्णालयात 5 लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकता
BPL कार्ड :
बीपीएल हे असे कार्ड आहे जे खास करून गरीब कुटुंबातील व्यक्तींसाठी बनवले जाते, खास करून अशा लोकांना हे कार्ड दिले जाते की जे दारिद्र्य रेषेखालील असतात किंवा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिक असतात हे कार्ड गुलाबी व पिवळ्या रंगाचे असते व या कार्ड वरती तुम्हाला सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जातात व त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो,
तसेच तुम्हाला सरकारकडून गहू,तांदूळ,ज्वारी,बाजरी,मका असे रेशन मोफत मिळते, तसेच घर बांधण्यासाठी किंवा जुने घर नवीन तयार करण्यासाठी देखील या कार्डच्या मदतीने अनुदान हे सरकार मार्फत दिले जाते, याचबरोबर या कार्ड च्या साह्याने तुम्हाला दवाखान्यातील गोळ्या औषधे देखील मोफत दिली जातात असे असंख्य फायदे या कार्डचे आहेत त्यामुळे तुम्ही हे कार्ड काढले पाहिजे
कामगार कार्ड :
कामगार कार्ड हे प्रत्येक राज्यासाठी वेगळे बनवण्यात आलेले कार्ड आहे व या कार्डमुळे राज्यात किती कामगार आहेत याची माहिती सरकारकडे राहते व त्या कामगारांसाठी कोणत्या योजना राबवल्या पाहिजे याचा देखील सरकार अभ्यास करते व त्या योजना दरवर्षी कामगार कार्डच्या सहाय्यतेने सर्वांसाठी राबवत असतेतसेच कामगार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी देखील तुम्हाला अनुदान हे देण्यात येते, तसेच मुलाबाळांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी देखील या कार्डच्या मार्फत मदत दिली जाते, याच बरोबर कामगारास कामाच्या वेळी जर काही झाले तर या कार्डमुळे त्याला 5 लाख रुपये अनुदान दिले जाते