शेतकऱ्यासाठी उन्हाळ्यात ज्वारी लागवड ठरेल फायदेशीर | उन्हाळी ज्वारी लागवड माहिती 

महाराष्ट्रा मध्ये रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक म्हणजे ज्वारी लागवड व ही ज्वारी लागवड यावर्षी महाराष्ट्रा मध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे परंतु काही भागात शेतकऱ्यांकडून या पिकासाठी पेरणी उशिरा झाली त्यामुळे ज्वारीच्या पिकात योग्य वाढ झाली नाही याचा परिणाम आता आपल्याला बाजारपेठांमध्ये पाहायला मिळणार आहे ते कसे तर यावर्षी महाराष्ट्र मधून ज्वारी पिकाचे उत्पादन कमी निघण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे ज्याचा ज्याचा फायदा व परिणाम शेतकऱ्याला व व्यापाऱ्याला होणार आहे

unhali jowar lagwad mahiti

उन्हाळी ज्वारी लागवड 

अर्थातच यावर्षी ज्वारी पिकाचे दर हे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे,त्यामुळे कृषी विभागांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे योग्य पाण्याचे सोय आहे त्यांनी उन्हाळी ज्वारी पिकाची लागवड करण्यास सुरुवात करावी

उन्हाळी ज्वारी लागवडीसाठी कोणते बियाणे वापरावे

कृषी विभागाने सांगितले आहे की उन्हाळी ज्वारी लागवड हे मकर संक्रातीच्या पाच ते सहा दिवसात करावी तेव्हा केल्यास तुम्हाला पुढील दोन महिन्यात योग्य उत्पादन मिळेल त्यासाठी तुम्ही उन्हाळी हंगामासाठी मालदांडी 35 -1 या लोकप्रिय वाहनाबरोबरच परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुदा,फुले यशोदा अशा वाणांचा तुम्ही या पेरणीसाठी उपयोग करू शकता.

ज्वारी लागवड खत व्यवस्थापन

ओलिताखालील उन्हाळी ज्वारीसाठी 80.40.40, नत्र: स्फूरद पालाश किलो प्रती हेक्टर द्यावे ही मात्रा मिश्र खतातून देणार असल्यास तीन बॅग 10 26 26 मिश्र खत आणि 50 किलो युरिया पेरणीच्या वेळी द्यावा त्यानंतर 30 ते 40 दिवसांनी 50 किलो युरिया पाण्याच्या पाळी सोबत द्यावा

Leave a Comment