उन्हाळी मका लागवड नफा,खर्च,फायदे | maka lagwad

शेतकरी मित्रांनो उन्हाळी लागवडी मधील शेतकऱ्याच एक महत्त्वाच पीक म्हणून ओळखल जाणार पीक म्हणजे मका लागवड. मका लागवड हे एक अस पीक आहे की ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या दोन-तीन महिन्यात चांगले उत्पादन होते व तसेच त्या पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होतो त्यामुळे जनावरांच्या खाद्यपदार्थांचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूधवाढी मधून देखील शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळते. आणि शेतकरी मित्रांनो मका लागवडीसाठी उन्हाळी हंगाम म्हणजेच उन्हाळी मका लागवड हे योग्य हंगाम मानला जातो. तर आज आपण संपूर्ण उन्हाळी मका लागवड कशी केली जाते यावर माहिती पाहणार आहोत त्यामुळे दिलेली सविस्तर माहिती तुम्ही पूर्ण वाचा.

maka lagwad

उन्हाळी मका लागवड कधी करावी

शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामधील मका लागवड जर आपल्याला करायची असेल तर आपण एक जानेवारी ते 15 फेब्रुवारी च्या दरम्यान हि लागवड करू शकता या महिन्यात जर आपण लागवड केली तर आपलं उत्पादन हे मे ते जून महिन्यात आपल्याला मिळून जाईल आणि आपलं उत्पादन हे पाऊस पडायच्या आधी होईल ज्यामुळे आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारच्या पावसाचा किंवा इतर नैसर्गिक नुकसान होणार नाही.

मका लागवड रान कसं तयार करायच

लागवड करायच्या आधी आपल्याला रान तयार करायच आहे.त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शेतामध्ये प्रति एकर पाच ते सहा ट्रॉली शेणखत किंवा गांडूळ खत टाकायचे आहे. त्यानंतर शेतामध्ये आपल्याला उभ्या व आडव्या स्वरूपाची नांगरट करून घ्यायची आहे जर आपल्याकडे ट्रॅक्टर नसेल तर आपण कुळवणी करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला रोटर मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सरी पाडून वाफे तयार करायचे आहेत. सरी ह्या आपल्याला जमिनीच्या उताराच्या भागाने पाडून घ्यायच्या आहेत. आणि दोन सरींमधील अंतर हे आपल्याला 2.5 ते 3 फुटाच्या आसपास ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या पिकाला हवा मिळण्यास व वाढीस एक उत्तम जागा प्राप्त होईल.

उन्हाळी मका लागवड बियाणे

 शेतकरी मित्रांनो मका लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची जी निवड करावी लागते ती म्हणजे मका लागवड बाणांची निवड या पिकासाठी खालील बियाणे हे एक उत्तम बियाणे म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. ( ADVANTA 756,P3401 POINEER/,DNH8255 TATA, NK 30 SYNGENTA, PAC 751,DEKALB, NK6240 SYNGENTA, P3502 POINEER,) वरील सर्व बियाने माहितीच्या आधारे आपल्याला सुचवली आहेत. त्यामुळे लागवड करण्याआधी आपण जवळच्या कृषी कार्यलायत जाऊन या सम्बंधित माहिती घेऊ शकता प्रति एकर 9 ते 10 किलो बियाने आपल्याला पेरनीसाठी लागु शकते.

लागवड कशी करायची

  • शेतकरी मित्रांनो या पिकाची लागवड करायच्या आधी आपल्याला,सरी पाडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये प्रति एकर 10.26.26 जवळपास चार ते पाच पोती टाकायचे आहे. आणि त्याचबरोबर दोन पोती युरिया देखील आपल्याला टाकायचा आहे. हे आपण सरी मारल्यानंतर टाकूण घ्यायच आहे. त्यानंतर सरींमध्ये आपल्याला पाणी सोडायचे आहे पाणी हे आपण ड्रीप ने किंवा पाटाने देखील सोडू शकतो.
  • एक दिवस पाणी जमिनीमध्ये योग्य प्रकारे मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मका पिकाची लागवड करायची आहे. महाराष्ट्रमध्ये खूप सारे शेतकरी हे ADVANTA 756 पीक करतात त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे पीक बाराही महिने येत. तसेच कमीत कमी दोन कणसे ही रोपाला लागतात. त्यामध्ये दोन कणसाचे वजन हे अर्धा किलोच्या वरती देखील निघते.
  • बियाण्यांची लागवड करत असताना आपल्याला चार ते पाच इंच अंतर हे दोघांमध्ये ठेवायच आहे. आणि त्यानंतर मग एक एक दाना घालून लागवड करायची आहे. लागवड ही आपण एका सरीच्या उंचीच्या जिथपर्यंत पाणी पोहोचल आहे त्याच्या खालच्या भागापासून आपण लागवड करणार.

खतव्यवस्थापन

  • लागवड केल्यानंतर पिकावर सर्वात पहिला जो अटॅक होतो. तो म्हणजे लष्करी आळीचा अटॅक तर तो टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीचा टाईमला रोपे मोठे झाल्यानंतर म्हणजेच रोपे वीस ते पंचवीस दिवसांची झाल्यानंतर त्यावर N वान,आणि प्रोगलिन ही औषदे फवारून घ्यायची आहेत. हे फवारल्यानंतर एकाच फवारणीत तुमच्या सर्व पिकातील अळी नष्ट होईल.
  • तसेच लागवडीच्या टाईमला तेंजन नावाच औषध आपल्याला 200 लिटरच्या आसपास प्रती एकर फवारायचे आहे आणि तसेच किडींवरचं औषध देखील 200 लिटर आपल्याला बाजारांमधील योग्य औषध घेऊन  फवारायचे आहे.त्यानंतर आपल्याला युरिया खत पाण्याबरोबर टाकायचा आहे.
  • या पिकासाठी खास करून जास्त औषधांची गरज भासत नाही परंतु आपल्याला काही ठराविक औषधे ही या पिकासाठी वापरायची आहेत.

मका एकेरी उत्पादन व खर्च

मका या पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळजवळ अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी प्रति एकरी संपूर्ण खर्च हा 20 ते 25 हजार इतका येतो. आणि या खर्चातून दोन ते तीन महिन्यानंतर उत्पादन हे दीड लाखापर्यंत जाते. त्यानंतर उरलेला चारा आपण जनावरांसाठी किंवा तो विकू देखील शकतो त्याचा देखील आपल्याला वरती फायदा होत असतो.

मका लागवड फायदे

शेतकरी मित्रांनो मका हे पीक गाई म्हशींच्या किंवा शेळी पालन किंवा इतर जनावराच्या चारा पिकातील एक महत्त्वाच पीक आहे. असं का तर या पिकांमधून शेतकऱ्याला दोन प्रकारे उत्पादन हे मिळते एक म्हणजे मका विकून तर दुसरं म्हणजे घरगुती मका पिकाच्या हिरव्या वैरणीचा चारा करून त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यामध्ये केला तर त्यातून आपल्याला जनावरांच्या दूध वाढीतून उत्पादन हे मिळत असते.

Leave a Comment