वारकऱ्यांनसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी अनुदान योजना

महाराष्ट्रा मधिल लोकांच्या जुन्या परंपरेमधील विठ्ठल दर्शनाची वारी ही एक परंपरा जी खूप वर्षा पासून महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आहे व या वारीमध्ये जास्त करून महाराष्ट्रामधिल ग्रामीण भागातील लोकांचा सर्वांचे जास्त समावेश असतो.

परंतु वारी म्हटलं तर प्रत्येक भागातून किंवा गावांमधून एक दिंडी निघून त्यामध्ये वारकरी सामील होऊन विठ्ठल दर्शनासाठी पायी यात्रा काढतात जी आषाढी एकादशी साठी असो किंवा पंढरीची किंवा आळंदीची वारी असो त्यामध्ये असंख्य लोकांचा समावेश हा खूप मोठ्या प्रमाणात असतो.

परंतु वाहतुकीमुळे व पायी प्रवासामुळे असंख्य वारकरी हे वारीच्या वेळेस आजारी पडतात तसेच काही वारकऱ्यांचा वाहतुकीच्या दरम्यान अपघात देखील होतो व अपघाताच्या दरम्यान काही वारकऱ्यांच्या मृत्यू देखील होतो किंवा त्यांना कायमचे अपंगत्व देखील येते या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने त्या सर्व वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना ही सुरू केली आहे ज्या योजनेतून वारकऱ्याला 35 हजार पासून ते 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ तुम्ही जर वारकरी असाल तर कसा घेऊ शकता या संबंधित अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या संपूर्ण लेख वाचा.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजना काय आहे

महाराष्ट्र मध्ये 29 जून 2023 पासून आषाढी एकादशी वारीची सुरुवात होणार आहे या वारीसाठी अनेक ग्रामीण भागातून व शहरी भागातून दिंड्या निघणार आहे आणि या पायी दिंड्यांमध्ये असंख्य वारकऱ्यांचे अपघात होत असतात त्यामध्ये असंख्य वारकऱ्यांना अपंगत्व येत असते तसेच वारीच्या दरम्यान असंख्य वारकरी आजारी पडतात यामुळे वारकऱ्यांना हवी अशी वारी करता येत नाही व एक प्रकारे त्यांच्या कुटुंबावर एक दुःखांचे संकट येतं हे टाळण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना ही सुरू केली आहे याचा लाभ सर्व वारकऱ्यांना घेता येईल.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना अनुदान

नुकतीच महाराष्ट्र सरकारने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेला मंजुरी दिली आहे यामध्ये आत्ता होणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत जे पण वारकरी सहभागी होणार आहे त्या सर्व वारकऱ्यांना खालील प्रकारे अनुदान हे महाराष्ट्र सरकार अनुदान देणार आह

विमा रक्कमरु.१,००,०००/- (कंपनीकडून)
विमाहप्तारु. १८/- (प्रति १ लाख विमा रकमेसाठी)
विमा कालावधी३० दिवस
विमा रक्कम१,००,००० (CSI)
अ.क्र.अपघाताचे स्वरुपटक्केवारी
1अपघातामुळे आलेला मृत्यु१००% विमा रक्कम (CSI)
2अपघातात दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक हात / पाय व एक डोळा१००% विमा रक्कम (CSI)
3एक हात, एक पाय, एक डोळा५०% विमा रक्कम (CSI)
4कायमचे अपंगत्व / विकलांगता१००% विमा रक्कम (CSI)
वैद्यकीय उपचाराचा खर्चप्रत्यक्ष खर्च किंवा ३५,०००/ 

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना फायदे

महाराष्ट्र मध्ये 29 जून ला आषाढी एकादशी असल्यामुळे 22 जून ते 6 जुलै पर्यंत  आषाढी वारी निमित्त महाराष्ट्र मधील पंढरपूर शहरात वारकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी ही होत असते याचाच विचार करून जी महाराष्ट्र सरकारने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू केली आहे या योजनेचे खालील प्रमाणे फायदे वारकऱ्याला घेता येतील

  • सर्वप्रथम महाराष्ट्र सरकार वारकऱ्यांसाठी संपूर्णपणे टोलमुक्ती करणार आहे म्हणजेच जर वारकरी गाडीने प्रवास करत असेल तर प्रवासाच्या दरम्यान त्याला कोणत्याही प्रकारचा टोल भरावा लागणार नाही
  • यानंतर वारकऱ्याचा वारीच्या दरम्यान जर अपघाती मृत्यू झाला तर त्या वारकऱ्याच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकार 5 लाख रुपया पर्यंत अनुदान हे देणार आहे ज्यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक फायदा होईल
  • यानंतर वारीच्या दरम्यान जर वारकऱ्याचा अपघात होऊन वारकऱ्याला अपंगत्व आले तर त्याला महाराष्ट्र सरकार 1 लाख पासून ते 3 लाखापर्यंत अनुदान हे देणार आहे याचा देखील फायदा थोडाफार वारकऱ्याला होणार आहे
  • यानंतर पायी दिंडी वारी काढत असताना जर खूप प्रवास करून वारकरी आजारी पडले किंवा एखाद्या वारकरी आजारी झाला तर त्याच्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकार 35 हजार रुपये इतके अनुदान या योजनेमार्फत वारकऱ्याला देणार आहे
  • असे वरील फायदे या योजनेतून वारकऱ्याला मिळणार आहे
FAQ

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना काय आहे

महाराष्ट्र सरकारने खास करून वारकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी ही एक योजना आहे व या योजनेतून वारकऱ्याला 35 हजारापासून ते 5 लाख पर्यंत अनुदान हे देण्यात येणार आहे.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना कालावधी

महाराष्ट्र सरकारने या योजनेचा कालावधी हा 21 जून पासून ते 6 जुलै पर्यंत ठेवला आहे या कालावधीमध्ये वारकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment