शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी व बेरोजगार तरुणांसाठी विविध योजना या राबवल्या जातात ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असो किंवा विशेष प्रवर्गातील नागरिक असो या सर्वांसाठी अनेक प्रकारच्या योजना शासन राबवत असते त्यामधील एक योजना म्हणजे VJNT Loan Scheme व्यावसायिक कर्ज योजना.
VJNT Loan Scheme ही वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना आहे या योजनेअंतर्गत एखाद्या व्यवसाय करणाऱ्या नागरिकाला आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिले जाते. या योजनेसंबंधी अधिक माहिती आपण खालील लेखामध्ये दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा.
वसंतराव नाईक महामंडळ व्यवसाय कर्ज योजना
मित्रांनो वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना ही एक अशी योजना आहे की जी फक्त एक विशिष्ट प्रवर्गातील आणि भटक्या जमातीतील जातींसाठी राबवली जाते जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकास देखील या योजनेचा लाभ घेऊन एक व्यवसायाची सुरुवात करता येईल या योजनेअंतर्गत व्यवसाय इच्छुक नागरिकास बिनव्याजी एक लाख रुपये पर्यंत कर्ज हे दिले जाते
वसंतराव नाईक महामंडळ व्यवसाय कर्ज योजनेत कर्ज हे 35 ते 40 प्रकारच्या नवीन व्यवसायासाठी देण्यात येते. जेव्हा ही योजना नवीन आली होती तेव्हा सुरुवातीला महामंडळ हे 25 हजारापर्यंत कर्ज हे देत होतं परंतु 2023 यावर्षी महामंडळाने कर्ज वाढ ही एक लाख रुपये इतकी केली आहे त्यामुळे एखाद्या व्यवसायासाठी इच्छुक नागरिकाची भांडवलासाठी योग्यपणे सोय होणार आहे.
वसंतराव नाईक योजना फायदे
- मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की ही योजना एक प्रकारे भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबवण्यात येते त्यांना समजा जर एखादा व्यवसाय करायचा असेल परंतु आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे भांडवलासाठी पैसे नसतील तर या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदत केली जाते.
- भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिक आपण पाहिलं तर छोटा मोठा व्यवसाय करत असतात खूप सारे नागरिक तर मासाळ विक्री,भाजीपाला विक्री, फळ विक्री किंवा शेतीपूरक व्यवसाय हे करत असतात परंतु त्यांना त्यातून आर्थिक फायदा खूपच कमी होत असतो त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी वसंतराव नाईक यांनी ही योजना स्थापन केली आहे.
- भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसोबत अपंग,निराधार व विधवा महिलांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज कोणत्या व्यवसायासाठी दिले जाते
मित्रांनो खालील दिलेल्या व्यवसायांसाठी वसंतराव नाईक महामंडळ कर्ज देते.
1. मत्स्य व्यवसाय | 2. कृषी क्लिनिक |
3. पावर टिलर | 4. हार्डवेअर-पेंट शॉप |
5. सायबर कॅफे | 6. संगणक |
7. झेरॉक्स-स्टेशनरी | 8. सलून |
9. ब्युटी पार्लर | 10. मसाला उद्योग |
11. पापड उद्योग | 12. मिरची कांडप |
13. वडापाव विक्री | 14. भाजी विक्री |
15. D.T.P वर्क | 16. स्वीट मार्ट |
17. ड्राय क्लिनिंग | 18. हॉटेल |
19. गॅरेज | 20. मोबाईल रिपेरिंग |
21. फ्रिज दुरुस्ती | 22. A.C दुरुस्ती |
23. मटन शॉप | 24. इलेक्ट्रिकल शॉप |
25. आईस्क्रीम पार्लर | 26. भाजीपाला विक्री |
27. मासळी विक्री | 28. फळ विक्री |
29. किराणा दुकान | 30. छोटेसे दुकान |
31. टेलिफोन बूथ | 32. लघुउद्योग |
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
- या योजनेसाठी उमेदवाराचे ओळखपत्र हे लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड
- त्यानंतर कर्ज मिळण्यासाठी उमेदवारा जवळ बँकेत अकाउंट असणे गरजेचे आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देखील लागणार आहे
- यानंतर तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे
- यानंतर प्रकल्प अहवाल तुमचा व्यवसाय कोणता आहे याचा प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तुम्हाला लागणार आहे
- यानंतर तुम्हाला अर्जासाठी दोन पासपोर्ट साईज चे फोटो देखील लागणार आहेत
- तसेच अजून इतर ठराविक कागदपत्रे देखील तुम्हाला लागतील या संबंधित तुम्ही यशवंतराव नाईक या संकेतस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकता.
वसंतराव नाईक कर्ज योजना अर्ज कसा करायचा
- मित्रांनो वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महामंडळाच्या या अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे तुम्ही मोबाईल द्वारे देखील अर्ज करू शकता
- या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमची सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी तिथे दिलेल्या आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे सर्व कागदपत्रे वाचून जर तुमच्याकडे ती कागदपत्रे असतील तरच तुम्ही तिथे अर्ज करा
- तुम्हाला जर मोबाईल वरती अर्ज भरण्यासाठी काही समस्या येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर नेट कॅफे मध्ये जाऊन देखील अर्ज भरू शकतो
- अर्जा संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही युट्युब वरती प्रात्यक्षिक व्हिडिओ देखील पाहू शकता.
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |
वसंतराव नाईक महामंडळ कर्जाचे स्वरूप
- मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला तर तुम्हाला या योजनेचे कर्ज हे दोन विभागांमध्ये दिले जाईल
- कर्जाचा पहिला हप्ता हा तुम्हाला 75 टक्के म्हणजेच 75 हजार रुपये इतका मिळेल तो तुम्हाला व्यवसाय सुरू होण्याच्या आधी मिळेल त्यानंतर दुसरा हप्ता हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर तीन महिन्याने 25 टक्के इतका 25 हजार रुपये इतका मिळेल असे एकूण तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये 1 लाख रुपयाचे कर्ज दिले जाईल
- यानंतर तुमच्या कर्जावर व्याजदर हे नसणार आहे परंतु तुम्ही जर नियमित परतफेडच्या कालावधीच्या आधी जर कर्जाची परतफेड केली नाही तर त्यानंतर जेवढा वाढीव कालावधी होईल त्या प्रत्येक कर्जाच्या थकीत हप्त्यावरती चार टक्के व्याजदर आकारण्यात येईल त्यामुळे कर्जाची परतफेड ही तुम्हाला वेळेवर करायची आहे