वेलची फायदे : आपल्या भारतामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हिरव्या रंगाची वेलची ही असतेच त्याचा वापर मुख्यता खाण्यात किंवा चहा मध्ये केला जातो, व त्या वेलची चा सुगंध देखील खूप चांगला असतो. ज्याचा वापर व्यवसायिकाकडून गोड पदार्थ बनवण्यासाठी खूप प्रमाणात केला जातो कारण की याचा वास हा मिठाईला खूप उत्तम सुगंध देतो.
वेलची खाण्याचे फायदे काय आहेत
- मित्रांनो वेलची खाण्याचा सर्वप्रथम जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या तोंडातील दुर्गंध वास घालवण्यासाठी वेलची ही खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते
- दररोज एक वेलची खाल्याने उलटी,खोकला,रक्त विकार, हृदयविकार,मुतखडा, डोक्याचे विकार अशा विकारांवर वेलची फायदेशीर ठरते
- यासोबत जर तुम्हाला अपचन होत असेल,ढेकर येत असेल किंवा भूक लागत नसेल तर यावर वेलची सारखा दुसरा आयुर्वेदिक कोणताच उपाय नाही
- तर तुम्हाला उलटीचा त्रास होत असेल तर तुम्ही वेलचीचा काढा करून पिला तर तुमचा हा त्रास कमी होईल (दिवसभरात ठराविक वेळेत चार चार चमचे हा काढा घेत राहावा)
- कप किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर वेलची आणि सोंटीचे चूर्ण एकत्र करून त्यामध्ये मध घालून त्याचे दिवसभरात ठराविक वेळेत चाटण केल्याने तुमचा कप व खोकला बरा होतो
- त्यानंतर तुमचे पोट जर दुखत असेल किंवा पोटात गॅस झाला असेल तर तुम्ही अर्धा ग्रम वेलची चूर्ण घेऊन, त्यात पाव ग्राम हिंग घालून व त्यात अर्धा लिंबू टाकून ते सेवन करावे तुमचा पोटातील गॅस निघून जाईल
- लघवी करताना जर तुम्हाला जळजळ होत असेल तर तुम्ही वेलचीचा चहा दररोज घ्यायला हवा त्याने हा आजार बरा होतो
- असे वरील वेलची खाण्याचे गुणकारी आयुर्वेदिक फायदे आहेत जे तुम्ही वाचू शकता
वेलची चे झाड घरी कसे लावायचे
मित्रांनो वेलची चे झाड घरी लावण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हिरवी वेलची घ्यायची आहे त्यानंतर वेलची सोलून त्यामध्ये असणारे बारीक काळे दाणे म्हणजेच वेलची च्या बिया घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या बिया तुमच्याजवळ असणाऱ्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी वेलची चे झाड उगवण्यास सुरुवात होते व दोन महिन्यात त्या वेलची च्या झाडाला वेलची येण्यास सुरुवात होते