विद्युत सहायक पगार | वायरमन ला किती पगार असतो

मित्रांनो MSEB महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सेवेत काम करणाऱ्या विद्युत सहाय्यक पदाला म्हणजेच वायरमन या पदाला किती पगार असतो व त्याचे कामाचे स्वरूप कसे असते याबद्दल आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे खालील लेख व्यवस्थित वाचा

vidyut sahayak salary in maharashtra

विद्युत सहायक पगार | vidyut sahayak salary in maharashtra

विद्युत सहाय्यक पगार
पहिल्या वर्षी15728 रुपये
दुसऱ्या वर्षी16 हजार 728
तिसऱ्या वर्षी20 हजार 728

विद्युत सहाय्यक पदासाठी पगार कसा दिला जातो

  • मित्रांनो जेव्हा तुमची विद्युत सहाय्यक या पदासाठी निवड होते तेव्हा तुम्हाला सुरुवातीची तीन वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेस वरती काम करावे लागते
  • ज्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला पहिल्या वर्षीचा पगार हा 15728 रुपये असतो परंतु त्यामध्ये 728 रुपये तुमच्या पीएफ कट होतो व इतर काही कट होऊन तुमच्या हातामध्ये 13500 मिळतात
  • यानंतर दरवर्षी तुमच्या पगारामध्ये हजार रुपयांनी वाढ होत असते यामध्ये तुम्ही तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम केल्यावर तुमचा पगार हा 18 ते 20 हजाराच्या दरम्यान जातो
  • यानंतर तीन वर्षाचे विद्युत सहाय्यक पदाचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुम्हाला महावितरण मध्ये परमनंट टेक्निशियन म्हणून घेतले जाते तेव्हा तुमचा पगार हा 25 ते 30 हजार रुपये महिना इतका पडतो
  • यानंतर पुन्हा काही वर्ष काम केल्यानंतर तुमचे टेक्निशियन या पदावरून तुमचे प्रमोशन हे वरिष्ठ सहाय्यक म्हणून केले जाते तेव्हा तुम्हाला 40 हजार रुपये पगार दिला जातो
  • पुन्हा तुमचे वरिष्ठ सहाय्यक पदावरून काही वर्षांनी शेवटचे प्रमोशन होते ते म्हणजे प्रधान-तंत्रज्ञ आणि या पदावरती तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये इतके वेतन दिले जाते
  • त्यानंतर जेव्हा तुम्ही परमनंट पोस्टवर येता तेव्हा तुमच्या पगारांमध्ये दरवर्षी हजार ते दोन हजार रुपयाची महागाई प्रमाणे वाढ होत असते

विद्युत सहाय्यक बनवण्यासाठी पात्रता काय आहे

विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची पात्रता ही खालील प्रकारामध्ये मोडते

  • महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची इलेक्ट्रिशन या ट्रेड मधून आयटीआय असणे गरजेचे आहे
  •  यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दहावी मधील शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे
  • अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे
  • आयटीआय चे सर्टिफिकेट प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे

विद्युत सहाय्यक निवड पद्धत कशी आहे

  • विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज केल्यानंतर सर्वप्रथम उमेदवाराची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते
  • ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा ही 150 गुणांची असते व त्या परीक्षेसाठी कालावधी हा 120 मिनिटाचा असतो त्यामध्ये एकूण 130 प्रश्न विचारले जातात
  • वरील परीक्षेत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे
  • वरील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक व मेडिकल चाचणीसाठी बोलवले जाते यामध्ये उमेदवाराची संपूर्ण चाचणी केली जाते

विद्युत सहाय्यक प्रमोशन किती असतात

मित्रांनो विद्युत सहाय्यक म्हणजेच वायरमन या पदाची प्रमोशन ही चार प्रकारची असतात सर्वप्रथम विद्युत सहाय्यक पदावर उमेदवाराची निवड होते त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीनंतर त्याचे प्रमोशन हे टेक्निशियन म्हणून करण्यात येते यानंतर काही वर्षांनी त्याचे प्रमोशन पुढचे वरिष्ठ सहाय्यक म्हणून केले व यानंतर ला शेवटचे प्रमोशन होते प्रधान तंत्रज्ञ असे चार प्रमोशन हे विद्युत सहाय्यक पदाचे आहेत

MSF ला पगार किती आहेयेथे क्लिक करा 
महाराष्ट्र कर निर्धारण अधिकारी पगारयेथे क्लिक करा 
कृषी सेवक पगारयेथे क्लिक करा 
कृषी सहाय्यक पगारयेथे क्लिक करा 
FAQ
विद्युत सहाय्यक म्हणजे काय

जेव्हा (एम.एस.सी.बी) महावितरण कंपनी विद्युत सहाय्यक या पदाची नवीन भरती काढते तेव्हा जी नवीन उमेदवारांची या भरतीतून तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेस पदावरती निवड होते त्यालाच विद्युत सहाय्यक म्हटले जाते

विद्युत सहाय्यक पद कसे भरले जाते

महाराष्ट्र शासनाच्या विद्युत किंवा ऊर्जा विभागाच्या अंतर्गत ही भरती घेतली जाते

विद्युत सहाय्यक कंत्राटी कालावधी किती असतो

महावितरण विद्युत सहाय्यक कंत्राटी कालावधी हा निवड झालेल्या लाभार्थ्यासाठी 3 वर्षाचा असतो त्यानंतर त्याला परमनंट सेवेत घेतले जाते

विद्युत सहाय्यक पदासाठी वयोमर्यादा किती आहे

विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असावे व कमाल 38 वर्षाच्या आतील असावे यामध्ये माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त उमेदवार, भूकंप व उमेदवार यांना 45 वय वर्ष इतकी वयोमर्यादा दिली आहे

Leave a Comment