विस्तार अधिकारी पगार किती असतो | वेतनश्रेणी माहिती

महाराष्ट्रा मधील विस्तार अधिकारी पंचायत व विस्तार अधिकारी सांख्यिक या दोन्ही पदासाठी 35,400 ते 1,12,400 इतके वेतन दिले जाते ज्यामध्ये विस्तार अधिकारी या पदासाठी तुमची निवड झाल्यानंतर सुरुवातीचा पगार हा तुमचा 40 ते 50 हजार रुपये इतका असतो ज्यामध्ये महागाई भत्ता,घरभाडे भत्ता व वाहतुकी भत्ता देखील समावेश असतो.

vistar adhikari salary in maharashtra

विस्तार अधिकारी पगार

पद वेतन
विस्तार अधिकारी (पंचायत)35400 ते 112400
विस्तार अधिकारी (सांख्यिक)35400 ते 112400

विस्तार अधिकारी म्हणजे काय पद माहिती

जिल्हा परिषद अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांपैकी एक पद म्हणजे विस्तार अधिकारी पद हे आहे. विस्तार अधिकारी या पदाला गटविकास अधिकारी पद म्हणून देखील ओळखले जाते व या पदाचे काम ग्रामपंचायत वर देखरेख ठेवणे व कामात सहाय्य करणे एवढे असते

 विस्तार अधिकारी होण्यासाठी पात्रता काय आहे

  • विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पात्रताही खालील प्रमाणे असेल
  • सर्वप्रथम या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा
  • यानंतर अर्ज करणारा उमेदवार पदवीधारक असायला हवा
  • तसेच तुमच्याकडे जर ग्रामीण समाज कल्याण किंवा स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असेल तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये या पदासाठी प्राधान्य दिले जाईल
  • परंतु जर तुम्हाला विस्तार अधिकारी सांख्यिक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्या पदासाठी वेगळी पात्रता आहे जी तुम्ही खाली वाचू शकता
  • जर तुम्हाला विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे विज्ञान कृषी वाणिज्य किंवा कला अर्थशास्त्र किंवा गणित विषयातील पदवी असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता

Leave a Comment