मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

काही ठराविक कागदपत्रे ही मतदान कार्ड काढण्यासाठी लागतात ते तुम्ही खाली दिलेल्या माहितीमध्ये वाचू शकता

मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • जन्माचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • घरातील एका सदस्याचे मतदान कार्ड

वरील कागदपत्रे हे तुम्हाला मतदान कार्ड काढण्यासाठी लागणार आहेत

मोबाईलवर मतदान कार्ड कसे काढायचे

  • मोबाईलवर मतदान कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या या (www.nvsp.in)अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल यासाठी तुम्ही गुगल क्रोम ॲपच्या मदतीने या संकेतस्थळावरती जाऊ शकता
  • या संकेतस्थळावरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक असा पर्याय दिसेल(नवीन मतदार रजिस्ट्रेशन ऑनलाइन अर्ज करा) यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन अर्ज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की नाव,पत्ता,जन्मतारीख व इतर  माहिती
  • स्वतःची वैयक्तिक संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला स्वतःचे ओळखपत्र व इतर वरील दिलेली कागदपत्रे ही लागणार आहेत ती कागदपत्रे तुम्हाला तिथे अपलोड करावी लागते
  • संपूर्ण माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावरती क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या कालावधीत तुमची माहिती व कागदपत्रे संपूर्ण पणे तपासण्यात येतील व तुम्ही जर योग्य माहिती व योग्य कागदपत्रे दिली असतील तर तुमचे मतदान कार्ड हे ऑनलाइन पद्धतीने तयार होईल
  • अधिक माहितीसाठी तुम्ही युट्युब वरती प्रात्यक्षिक व्हिडिओ पाहून मतदान कार्ड कसे काढले जाते याची माहिती घेऊन त्याप्रमाणे ऑनलाइन मोबाईल वरती मतदान कार्ड काढू शकता

ऑनलाइन मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • वाहन परवाना
  • बँक पासबुक
  • दहावी बारावी निकाल
  • रहिवासी दाखला
  • विजेचे बिल
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
मतदान कार्ड आपण का काढले पाहिजे

मित्रांनो जेव्हा आपल्या देशामध्ये राज्यामध्ये किंवा गावांमध्ये जेव्हा निवडणुका होत असतात तेव्हा प्रत्येक नागरिकाकडे जर मतदान कार्ड असेल तर तो नागरीक स्वतःच्या इच्छेने गावासाठी व देशासाठी एक उमेदवार निवडू शकतो त्यामुळे आपल्याला मतदान कार्ड काढणे हे खूप गरजेचे आहे

मतदान कार्ड काढण्याचे फायदे
  • मतदान कार्ड काढण्याचा सर्वप्रथम फायदा असा की आपल्याकडे जर मतदान कार्ड असेल तर त्याचा उपयोग आपण ओळखपत्र म्हणून देखिल करू शकतो म्हणजेच अनेक प्रकारचे अर्ज करताना आपल्याला ओळखपत्राची गरज भासते तेव्हा आपण मतदान कार्डचा वापर हा ओळखपत्र म्हणून देखील करू शकतो
  • यानंतर दुसरा फायदा असा की मतदान कार्ड मुळे आपल्याला स्वतःच्या हक्काचा उमेदवार देखील निवडता येतो
  • यानंतर तिसरा फायदा असं की सरकार द्वारे विविध सरकारी योजना लोकांसाठी राबवल्या जातात त्यासाठी उमेदवाराकडे स्वतःचे ओळखपत्र असणे खूप गरजेचे आहे तर तेव्हा देखील आपल्याकडे जर मतदान कार्ड असेल तर आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येतो
FAQ
मतदान कार्ड काढण्यासाठी वय किती पाहिजे

 भारतीय न्याय राज्यघटनेनुसार जर एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्षावरील असेल तर त्याला मतदान कार्ड हे काढता येईल

मतदान कार्ड काढण्यासाठी अट काय आहे

ज्या व्यक्तीला मतदान कार्ड हे काढायचे आहे तो व्यक्ती ज्या गावातील किंवा ज्या शहरातील रहिवासी आहे त्याच ठिकाणी त्याला मतदान कार्ड हे काढता येईल व तेथील मतदानाचा हक्क बजावता येईल

ऑनलाइन मतदान कार्ड कसे काढायचे

 तुम्हाला या (voter.eci.gov.in) अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढता येईल

Leave a Comment