कृषी बातामी : आधुनिकीकरणामुळे आज पारंपारिक शेतीमध्ये बदल होऊन आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. पण खरोखरच आधुनिक शेती ही किती फायतशीर आहे की धोकादायक आहे हे देखील शोधणे काळाची गरज गरज आहे.
आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहेत यामध्ये कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. वाढती लोकसंख्या, नागरिकरण व दळणवळण यामुळे शेती क्षेत्र मर्यादित होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्न ,वस्त्र ,दळणवळण व इतर गरजा भागवण्यासाठी शेतीमध्ये अनेक रासायनिक घटकांचा अतिवापर होत आहे.रासायनिक घटक, कीटकनाशके व तणनाशके यांचा अधिक वापर झाल्याने शेती उत्पादनात वाढ होत असताना दिसून येते ,उत्पन्न वाढते .परंतु रासायनिक घटकांचा अतिवापर झाल्याने जमिनीचा पोत व अन्नधान्याचा सकसपणा कमी झाला आहे.
अनियंत्रित रासायनिक खते ,कीटकनाशके व तणनाशके यांच्या अतिवापरामुळे भूगर्भातील पाणी तसेच हवा दूषित झाले आहे, त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे एवढेच नव्हे तर शेती आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे .कॅन्सर सारख्या भयानक आजारांशी मानवाला सामना करण्याची वेळ आली आहे. रासायनिक घटकांच्या वापरामुळे जमिनीचे व मानवाचे आरोग्य धोक्यात आहे.आधुनिक काळात रासायनिक घटकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीची जोड दिली तर शेती आरोग्य व मानवी आरोग्य धोक्यात येणार नाही.