घरासाठी 1.5 लाख अनुदान मिळणार | रमाई आवास योजना कागदपत्रे

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र सरकार आता राज्यातील काही नागरिकांसाठी रमाई घरकुल योजना राबवणार आहे यासाठी पात्र नागरिकास रमाई आवास योजने अंतर्गत दीड लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर ते अनुदान कोणाला मिळू शकतं त्याची पात्रता काय आहे या संबंधित संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे तसेच अर्ज कसा केला जातो यासंबंधी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख व्यवस्थित वाचा

what document required for Ramai Aawas Yojana

रमाई आवास योजना कागदपत्रे | what document required for Ramai Aawas Yojana

  • ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • दोन फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • डिजिटल सातबारा झेरॉक्स
  • रेशन कार्ड
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स

वरील कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला रमाई आवास योजनेसाठी अर्ज करताना लागणार आहे त्यामुळे या कागदपत्रांची पूर्तता करूनच अर्ज करा

रमाई आवास योजना शासन निर्णय काय आहे

मित्रांनो रमाई आवास योजनेसाठी शासन निर्णय असा आहे की या योजनेसाठी अर्ज फक्त तेच नागरिक करू शकतात जे नागरिक अनुसूचित जाती व नवबौद्ध जाती SC, ST प्रवर्गातील नागरिक आहेत सरकारने खास करून त्यांना राहण्यासाठी सुरक्षित सोय व्हावी यासाठी ही योजना स्थापन केली आहे

रमाई आवास योजना पात्रता काय आहे

  • मित्रांनो या योजनेसाठी सर्वप्रथम पात्रता अशी आहे की अर्ज करणारा उमेदवार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा
  • अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील पंधरा वर्षे हुन अधिक राहणारा रहिवासी असावा
  • यानंतर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे याआधी कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे
  •  यानंतर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न हे एक ते दीड लाखाच्या आत असावे
  • अशी वरील पात्रता लाभार्थ्यासाठी अर्ज करण्यास आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून त्यानंतरच या योजनेसाठी अर्ज करा

रमाई आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा

  • मित्रांनो रमाई आवास योजनेसाठी अर्ज हा संपूर्णपणे तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालया मधून केला जातो त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊन रमाई आवास योजनेसाठी असणारा अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडून घेऊन भरायचा आहे
  •  अर्जा सोबत तुम्हाला वरील आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील
  • यानंतर ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तुमचा अर्ज हा या योजनेसाठी भरला जाईल यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांची एक यादी लागेल ज्यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे अनुदान मिळणार आहेत ते थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होईल
शिक्षणासाठी मिळणार 60,000 रुपयेयेथे क्लिक करा
FAQ

रमाई घरकुल योजना किती पैसे मिळतात

रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला एकूण संपूर्ण घराच्या खर्चासाठी 1 लाख चाळीस हजार रुपये मिळतात

 रमाई घरकुल योजना कोणासाठी आहे

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना आहे

रमाई घरकुल योजनेसाठी कोण अर्ज करू शकत

रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी हसायला हवा व तो अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील घटक असावा

रमाई आवास योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज हा तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता

रमाई आवास योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात

रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याला घराच्या संपूर्ण बांधकामासाठी व त्या बांधकामाच्या मजुरीसाठी एकूण 1 लाख 40 हजार रुपये इतके अनुदान मिळते

Leave a Comment