मित्रांनो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजना ही महाराष्ट्रातील दहावी,बारावी,पदवीधर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे यामध्ये महाराष्ट्रातील नवबौद्ध व अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साठ हजार रुपये इतके या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते
परंतु या योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो तो अर्ज कसा केला जातो व त्या अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात या संबंधित माहिती आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत
Table of Content
- स्वाधार योजना कागदपत्रे | what document required for Swadhar yojana
- स्वाधार योजना म्हणजे काय
- स्वाधार योजनेसाठी अर्ज कोण करू शकत
- स्वाधार योजनेचे फायदे काय आहेत
- स्वाधार योजनेतून किती पैसे मिळतात
- स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा केला जातो
- अकरावी बारावी किंवा पदवी मध्ये जर गॅप असेल तर अर्ज करता येईल का
- मुक्त विद्यापीठासाठी स्वाधार योजना आहे का
- पहिली स्कॉलरशिप असताना स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतो का
- वस्तीगृहात राहत असल्यास स्वाधार योजनेचा लाभ मिळेल का
स्वाधार योजना कागदपत्रे | what document required for Swadhar yojana
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
- जातीचा दाखला
- दहावी बारावी पदवीधर उत्तीर्ण प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- उमेदवार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- विद्यालय किंवा महाविद्यालय बोनाफाईड सर्टिफिकेट
- कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश नसल्याचे शपथपत्र
- महाविद्यालयामध्ये उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
वरील आवश्यक कागदपत्रे ही तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागेतील व स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी स्वाधार योजना पात्रता काय आहे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे
स्वाधार योजना म्हणजे काय
महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शिक्षणातील आर्थिक खर्चा साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतर्गत नवबौद्ध आणि अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी राबवली गेलेली एक योजना आहे
स्वाधार योजनेसाठी अर्ज कोण करू शकत
- सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज हे फक्त नवबौद्ध आणि अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी व विद्यार्थिनीच करू शकतात
- त्यानंतर अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे
- तसेच त्याच्याजवळ वरील कागदपत्रे देखील असणे गरजेचे आहे
- यानंतर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याला दहावी बारावी किंवा पदवी मध्ये 60% हून अधिक गुण असणे गरजेचे आहे
- तसेच त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे उत्पन्न हे दीड ते अडीच लाखाच्या कमी पाहिजे
- अशा वरील काही अटी आहेत ज्यामध्ये जर तुम्ही पात्र होत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा
स्वाधार योजनेचे फायदे काय आहेत
स्वाधार योजनेतून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी व शिक्षणातील आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी साठ हजार रुपये वार्षिक भत्ता दिला जातो ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा जेवणाचा खर्च यायचा जायचा व राहण्याचा व इतर खर्च देखील समाविष्ट असतो
वरील भत्ते हे विद्यार्थी ज्या शहरात शिक्षण घेत आहेत त्या शहरा अनुसार कमी जास्त दिले जातात जे तुम्ही खाली पाहू शकता
स्वाधार योजनेतून किती पैसे मिळतात
भत्ता | भत्ताचा लाभ |
भोजन भत्ता | 32000 |
राहण्याचं भत्ता | 22000 |
निर्वाह भत्ता | 8000 |
एकूण | 60 हजार |
स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा केला जातो
मित्रांनो स्वाधार योजना ही महाराष्ट्र समाज कल्याण विभागाकडून राबवली जाणारी एक योजना आहे
त्यामुळे तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या (www.sjsa.maharashtra.gov.in) संकेतस्थळावरती जावे लागेल व तिथून या अर्जाची एक पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करावी लागेल
त्यानंतर त्या पीडीएफ ची झेरॉक्स काढून संपूर्ण माहिती हाताने भरून त्यासोबत आवश्यक लागणारी वरील कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन द्यावा लागेल त्यानंतर त्या अर्जाची पूर्तता होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल
FAQ
अकरावी बारावी किंवा पदवी मध्ये जर गॅप असेल तर अर्ज करता येईल का
वरीलपैकी कोणत्याही वर्षात जर तुमचा गॅप असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो फक्त तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढावे लागेल
मुक्त विद्यापीठासाठी स्वाधार योजना आहे का
मुक्त विद्यापीठांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येत नाही
पहिली स्कॉलरशिप असताना स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतो का
मित्रांनो जर तुम्ही भारत सरकारची महाडीबीटी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो
वस्तीगृहात राहत असल्यास स्वाधार योजनेचा लाभ मिळेल का
वस्तीगृह जर शासकीय वस्तीगृह नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल परंतु जर वस्तीगृह शासकीय असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही