अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे कोणती लागतात

मराठा समाजातील तरुणांना किंवा नागरिकांना एक व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तीन टप्प्यांमध्ये कागदपत्रे द्यावे लागतात ती खालील प्रमाणे आहेत

what documents are required for annasaheb patil mahamandal yojana

 अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड किंवा पॅन कार्ड)
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • सातबारा उतारा

वरील कागदपत्रांची आवश्यकता ही सुरुवातीला अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज करताना लागणार आहेत जी कागदपत्रे तुम्हाला अर्ज च्या सोबत जोडावी लागतील. वरील कागदपत्रे अचूक असतील तर तुम्हाला बँकेतून कर्ज देण्यासाठी पात्र ठरवले जाईल त्यानंतर तुम्हाला खालील कागदपत्रे लागतील

बँकेतून कर्ज प्राप्त होण्यासाठी कागदपत्रे

  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • उद्योग व व्यवसाय सुरू करण्याबाबतचा परवाना
  • बँक खाते स्टेटमेंट
  • सिबिल रिपोर्ट
  • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

अशी कागदपत्रे जमा करून तुम्हाला बँकेतून या योजनेअंतर्गत अनुदान कर्ज स्वरूपात मिळेल परंतु यानंतर देखील व्याज परताव्यासाठी तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे

अण्णासाहेब पाटील योजना व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक स्टेटमेंट
  • व्यवसायाचे छायाचित्र
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • उद्योग परवाना

इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला व्याज परताव्यासाठी लागणार आहेत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी तुम्हाला अर्ज हा या (www.udyog.mahaswayam.gov.in) अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन करावा लागेल अर्ज हा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केला जाईल जो तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे किंवा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन करू शकता

Leave a Comment