मित्रांनो भारत सरकारने बाल आधार कार्ड काढण्यासाठी मंजुरी दिली आहे ज्यामध्ये लहान पाच वर्षातील बालकांना सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे ते आधार कार्ड तुम्ही खालील पद्धतीने काढू शकतात तसेच पाच वर्षांपुढील मुलांना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड काढायचे असेल तर ते देखील तुम्ही खालील पद्धतीने काढू शकता त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे
लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- पालकांचे आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- पालकांचे बायोमेट्रिक
- मोबाईल क्रमांक
- बाळाचा जन्माचा दाखला
- आधार कार्ड अर्ज
लहान मुलांचे आधार कार्ड कसे काढायचे
- सर्वप्रथम लहान मुलांच्या आधार कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल जे की तुमच्या तालुक्याचे ठिकाणी पोस्टमध्ये पाहायला मिळेल
- यानंतर तिथे जाऊन तुम्हाला संबंधित आधार कार्ड अर्ज भरून त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडून द्यावी लागतील
- त्यानंतर संबंधित आधार कार्ड केंद्रावरील अधिकारी तुमच्या मुलाची सर्व बायोमेट्रिक बोटाचे ठसे छायाचित्र असे सर्व प्रक्रिया करून घेईन त्यासाठी मुलाचे पालक तिथे असणे गरजेचे आहे कारण की त्यांचे देखील बोटाचे ठसे घेतले जातात
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती दिली जाते यामध्ये तुमचे नाव नाव नोंदणी क्रमांक तारीख व वेळ दिले असते व अर्ज केल्याच्या 20 ते 25 दिवसात तुमचे आधार कार्ड तुमच्या रहिवासी पत्त्यावर येऊन जाते (पॅन कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात)