मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला शेती करण्यासाठी सौर दिले जाते याचा वापर करून ते मोटार ने पाणी ओढण्यासाठी किंवा धरणाचे पाणी ओढण्यासाठी करू शकतात या योजनेचा लाभ कसा घेता येईल व कोणते कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कागदपत्रे
- सौर कृषी पंप योजना अर्ज
- ओळखपत्र आधार कार्ड व पॅन कार्ड
- सातबारा उतारा
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
वरील योजनेसाठी सर्व कागदपत्रे ही व्यवस्थित द्या कारण संबंधित महावितरण अधिकार्याकडून ही सर्व कागदपत्रे तपासली जातील व तुमच्या जमिनीचा देखील आढावा घेतल्या जाईल की जमीन ही तुमच्या नावावर असली पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी किती शुल्क भरावा लागेल
मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी खालील शुल्क पात्र लाभार्थ्याला भरावा लागेल जर जनरल कॅटेगिरी मधून असेल तर त्याला 03 एचपी साठी 16560 रुपये,05 एचपी साठी 24 हजार 710 रुपये, 7.5 एचपी साठी 33455 याप्रमाणे शुल्क भरावे लागेल
तसेच पात्र लाभार्थी जर एस सी किंवा एसटी प्रवर्गातील असेल तर त्याला तीन एचपी साठी 8280 रुपये पाच एचपी साठी 12355 7.5 एचपी साठी 16,728 रुपये अशाप्रकारे शुल्क हा भरावा लागेल
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 ऑनलाइन अर्ज
मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज तुम्ही दोन पद्धतीने करू शकता हे तर तुम्ही तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयांमध्ये जाऊन महावितरण अधिकाऱ्यांच्या साहाय्याने हा अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता दोन्ही अर्जासाठी कागदपत्रे ही वरील लागतील