अपंग पेन्शन योजना 2024 कागदपत्रे | अर्ज व अनुदान किती पूर्ण माहिती

महाराष्ट्र मध्ये अपंग नागरिकांना दुसऱ्यावर अवलंबून न राहण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपंग पेन्शन योजना ही राबवते त्या योजनेसाठी जर एखाद्या उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर त्याच्याकडे खालील प्रमाणे कागदपत्रे असायला हवीत

what documents required for apang pension yojana in maharashtra

अपंग पेन्शन योजना कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
  • 80 टक्के अपंगत्व प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक झेरॉक्स
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • वय पुरवा 
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अपंग पेन्शन योजना 2024 अर्ज कसा करायचा

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल
  • तसेच तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने हाताने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार तलाठी कार्यालयामध्ये जाऊन या योजने संबंधित माहिती देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता
  • या योजनेसाठी तुम्ही मोबाईलवर देखील अर्ज करू शकता मोबाईलवर अर्ज करण्यासाठी तुम्ही youtube चा उपयोग करून त्यावर प्रात्यक्षिक व्हिडिओ पाहून या योजनेसाठी अर्ज करू शकता
  • मोबाईलवर अर्ज करताना तुम्हाला कागदपत्रे ही स्कॅन करून त्या संकेतस्थळावरती अपलोड करावी लागतील स्कॅन करण्यास जमत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर किंवा ई सेवा केंद्रात जाऊन 40 ते 50 रुपयात या योजनेसाठी अर्ज करू शकता

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना 2024 अनुदान किती दिले जाते

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अनुदान हे दर महिना 600 रुपये इतके दिले जाते सरकारचा या योजनेमागे उद्देश एकच आहे की महाराष्ट्र मधील दिव्यांगांना आर्थिक मदत म्हणून सहाशे रुपये देणे

Leave a Comment