अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो जर आपण दिव्यांग म्हणजेच अपंग व्यक्ती असाल आणि आपल्याला जर अपंग प्रमाणपत्र हे काढायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील व तुम्ही कसे जलद गतीने अपंग प्रमाणपत्र हे काढू शकता याबद्दल आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे खालील दिलेल्या लेख संपूर्ण व्यवस्थित वाचा

अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड)
  • पत्ता पुरावा (आधार कार्ड, लाईट बिल,रहिवासी दाखला)
  • अपंगत्व असल्याचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • फोटो व सही

वरील काही कागदपत्रे ही तुम्हाला अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत

अपंग प्रमाणपत्र कसे काढायचे

मित्रांनो जर तुम्ही अपंग व्यक्ती असाल आणि जर तुम्हाला अपंग प्रमाणपत्र हे काढायचे असेल तर ते तुम्ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने काढू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा तुम्ही घरबसल्या देखील मोबाईल द्वारे अपंग प्रमाणपत्र साठी अर्ज करू शकता

  • जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपंग प्रमाणपत्र हे काढायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम ओपन करून तिथे हे UDID संकेतस्थळ सर्च करून या संकेतस्थळावरती जावे लागेल
  • या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक (apply for disability certificate and udid card) असा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अपंग  प्रमाणपत्र साठी एक अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये संपूर्ण तुमच्याबद्दल जेवढी माहिती विचारली जाईल तेवढी तुम्हाला तिथे व्यवस्थित भरायची आहे
  • तसेच वरील सांगितलेली कागदपत्रे देखील तुम्हाला तिथे लागतील त्यामुळे ती कागदपत्रे तुम्ही सोबत ठेवा
  • आणि जर तुम्हाला अर्ज कसा करायचा हे जर कळत नसेल तर तुम्ही युट्युब वरती अर्ज कसा केला जातो याची प्रात्यक्षिक व्हिडिओ देखील पाहू शकता
  • ऑनलाइन अर्ज संपूर्णपणे व्यवस्थित भरून झाल्यानंतर तो तुम्हाला पुन्हा एकदा परत चेक करून पाहायचा आहे व जी माहिती चुकली असेल ती पुन्हा भरायची आहे
  • माहिती जर संपूर्णपणे योग्य तुम्ही भरली असेल तर शेवटी तुम्हाला तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे
  • यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेला ऑनलाइन अर्ज दिसेल तो तुम्हाला तिथे डाऊनलोड करून घ्यायचा आहे व तो अर्ज घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यांमध्ये नेऊन द्यायचा आहे किंवा दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला अपंग प्रमाणपत्र हे मिळून जाईल
डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेयेथे क्लिक करा 
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रेयेथे क्लिक करा
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेयेथे क्लिक करा

अपंग प्रमाणपत्र ऑनलाइन डाऊनलोड करा

  • अपंग तो प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या या UDID.gov.in संकेतस्थळावरती जावे लागेल व येथे गेल्यानंतर तुम्हाला (downloaddownload your divisibility card and UDID card ) या पर्यायावर क्लिक करावी लागेल
  • यानंतर तुमच्यासमोर एक लॉगिन करण्याचे नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला लॉगिन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला environment number हा लागेल नंबर तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला मिळतो तो तिथे टाकायचा आहे जो तुम्हाला मोबाईल वरती टेक्स्ट मेसेज चा स्वरूपात आला असेल
  • यानंतर खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख व दिलेला कॅप्चर टाकून लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमचे अपंग प्रमाणपत्र हे दिसेल ते तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे आहे
FAQ

अपंग प्रमाणपत्र कसे काढायचे

अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या UDID या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करावा लागेल

अपंग प्रमाणपत्राचे किती प्रकार आहेत

अपंग प्रमाणपत्राचे तीन प्रकार आहेत मानसिक दृष्ट्या अपंग, ऑर्थोपेडिकली अपंग व मूकबधिर अपंग

अपंग प्रमाणपत्र meaning in English

अपंग प्रमाणपत्र याला इंग्रजीमध्ये disable certificate असे म्हणतात

Leave a Comment