मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामध्ये शिकत असाल किंवा नोकरी करत असाल तर तुमच्याकडे खाजगी व सरकारी या दोन्ही कामांसाठी तुमच्याकडे डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही हे डोमासाईल प्रमाणपत्र काढले पाहिजे त्यासाठी खालील कागदपत्रे ही तुम्हाला लागणार आहेत.
डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड,पॅन कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्माचा दाखला
- वडिल (शाळा सोडल्याचा दाखला)
- स्वयंघोषणापत्र
- रेशन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
डोमासाईल अधिवास प्रमाणपत्र कसे काढायचे
मित्रांनो तुम्ही दिवस प्रमाणपत्र हे दोन पद्धतीने काढू शकता एक ऑनलाईन व दुसरे ऑफलाइन पद्धतीने
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करावा लागेल व तिथे वरील सांगितलेली कागदपत्रे ही अपलोड करावी लागतील व त्यानंतरच तुम्हाला डोमासाईल हे मिळेल
यानंतर तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने डोमासाईल म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन तिथे कागदपत्रांसोबत अर्ज करून द्यावा लागेल व त्यानंतर तुम्हाला डोमासाईल हे मिळून जाईल
वरील प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला डोमासाईल मिळण्यास दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी जाईल
अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र पात्रता
मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रा मध्ये शिक्षण घेत असाल किंवा महाराष्ट्रा मध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला जर अधिवास प्रमाणपत्र हे लागत असेल तर तुम्ही खालील प्रमाणे पात्र असायला हवेत
- सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रा मध्ये 15 वर्षे राहिलेले रहिवासी असायला हवेत त्याचा तुमच्याकडे पुरावा म्हणून रहिवासी दाखला असणे खूप गरजेचे आहे
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रे | येथे क्लिक करा |
FAQ
डोमासाईल म्हणजे काय
मित्रांनो डोमासाईल म्हणजे आपण एखाद्या देशाचे किंवा राज्याचे मूळ रहिवासी नागरिक आहोत हे दर्शवणारा दाखला म्हणजे डोमासाईल होईल
अधिवास प्रमाणपत्र मुदत किती दिवस असते
मित्रांनो जर तुम्ही एकदा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल काढले असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची मुदत ही नसते, एक डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही किती पण वर्षे वापरू शकत
डोमासाईल सर्टिफिकेट चा वापर कुठे केला जातो
मित्रांनो डोमासाईल सर्टिफिकेट चा वापर हा अनेक खाजगी व सरकारी शैक्षणिक कामकाजामध्ये व नोकरी भरती या कामासाठी एक डॉक्युमेंट वेरिफिकेशन म्हणून केला जातो,तसेच शेतकऱ्यांसाठी जेव्हा सरकारी योजना सरकार राबवते तेव्हा देखील स्थानिक रहिवासी दाखला म्हणून डोमासाईल हे मागण्यात येते
डोमासाईल सर्टिफिकेट कुणाकडून दिले जाते
डोमासाईल सर्टिफिकेट हे तालुक्याच्या ठिकाणी काम करत असलेले तहसीलदार यांच्याकडून तुम्हाला दिले जाते