मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो लोकसभा व विधानसभा निवडणूका येणार आहेत त्यामुळे आपले वय जर 18 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान कार्ड काढले पाहिजे व ते मतदान कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत व ते मतदान कसे काढले जाते हे आज आपण पाहणार आहोत.

what documents required for issue voting card in maharashtra

मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड किंवा आधार कार्ड)

वरील ठराविक कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला मतदान कार्ड काढण्यासाठी भासते

मतदान कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे

  • मतदान कार्ड काढण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 1 जानेवारी, 1 एप्रिल,1 जुलै किंवा 1 ऑक्टोंबर महिन्यादरम्यान 18 वर्षे पूर्ण असायला पाहिजे
  • यानंतर अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय रहिवासी असायला हवा
  • ज्या ठिकाणी तुम्ही मतदान करणार आहात त्या ठिकाणचे तुम्ही मूळचे रहिवासी असायला  पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला असणे देखील गरजेचे आहे
  • यानंतर मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर सहा भरावा लागतो हा फॉर्म भरल्याने तुमचे नाव हे मतदान यादी मध्ये लागते

घरबसल्या मतदान कार्ड कसे काढायचे

  • मित्रांनो मतदान कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म नंबर सहा भरावा लागतो तो तुम्ही भारत सरकारच्या या (www.nvsp.in)  संकेतस्थळावरती जाऊन भरू शकता
  • या (www.nvsp.in) संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन आईडी करावी लागेल जर तुम्ही रजिस्ट्रेशन आईडी केली नसेल तर  क्लिक करून तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशन आईडी करा व त्यानंतर लॉगिन पर्यायावरती क्लिक करून तुमचा रजिस्टर नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्याच्या डाव्या बाजूस तुम्हाला असा ( new electro voter ID ) एक पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे
  •  तिथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा पेज लोड होऊन तुमच्यासमोर फॉर्म सहा ओपन होईल तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे तो फॉर्म मतदार म्हणून ओळखला जातो
  • ऑनलाइन पद्धतीने फॉर्म सहा कसा भरला जातो तो तुम्ही युट्युब वरती प्रात्यक्षिक पाहून व्यवस्थित रित्या भरू शकतात
  • संपूर्ण अर्ज भरल्यानंतर खाली दिलेला कॅपच्या व फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल वरती एक ईमेल व तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती मेसेज देखील येईल यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्मच स्टेटस पाहायला मिळेल
  • यानंतर निवडणूक विभागाकडून तुमच्या अर्जाची पूर्तता केली जाते व तुम्हाला पंधरा ते महिन्याभराच्या कालावधीमध्ये मतदान कार्ड हे तुमच्या रहिवासी पत्त्यावर मिळून जाते
डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेयेथे क्लिक करा 
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रेयेथे क्लिक करा
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेयेथे क्लिक करा
अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेयेथे क्लिक करा
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेयेथे क्लिक करा

मतदान कार्ड हरवले आहे

मित्रांनो जर तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर तुम्ही ते मतदान कार्ड घरबसल्या खालील पद्धतीने काढू शकता

  •   हरवलेले मतदान कार्ड घरबसल्या काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती निवडणूक आयोगाच्या या (www.nvsp.in) अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम त्या संकेतस्थळावरती रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्यायचे आहे लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज लोड होईल
  • लोड झालेल्या पेजेच्या डाव्या बाजूस ( new electro voter ID ) असा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • यानंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला फॉर्म 6 असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील कागदपत्रे व स्वतःबद्दल संपूर्ण माहिती लागेल ती माहिती त्या अर्थात वरून तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज कसा केला जातो याची प्रात्यक्षिक पाहण्यासाठी तुम्ही युट्युब वर एखादी व्हिडिओ पाहू शकता
FAQ
 मतदान कार्ड पीडीएफ डाऊनलोड

मतदान कार्ड पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या या (voterportal.eci.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन डाउनलोड करावे लागेल

Leave a Comment