मित्रांनो जेव्हा तुम्ही सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरीसाठी अर्ज करत असता त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रवर्गामध्ये सवलत मिळण्यासाठी तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे तर ते सर्टिफिकेट कसे काढले जाते व त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत यासंबंधीत आज आपण माहिती पाहणार आहोत तर खालील लेख संपूर्ण वाचा
Table of Content
- नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | what documents required for non creamy layer certificate
- मोबाईलवर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कसे काढायचे
- नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय
- नॉन क्रिमिलियर या प्रवर्गात कोण मोडते
- नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागते
नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | what documents required for non creamy layer certificate
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी किंवा एल.सी)
- वडिलांचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- रेशन कार्ड
- उमेदवाराचे दोन फोटो
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- तहसीलदार तहसील कार्यालय अर्ज
- अ ब वेगवेगळ
- तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालय
मोबाईलवर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कसे काढायचे
- सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम या अप्लिकेशन वरती आपले सरकार (aaple sarkar) हे संकेत स्थळ टाईप करून त्या संकेतस्थळावरती जायचे आहे
- यानंतर तुमच्यासमोर आपले सरकार या संकेतस्थळाचे होम पेज उघडेल तर त्या होम पेज वरती तुम्हाला असा ( new user? register here ) एक पर्याय दिसेल जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला या पर्यायावरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे
- तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथे खाली असणाऱ्या लॉगिन पेजवर तुमचा रजिस्ट्रेशन नेम, पासवर्ड व कॅपच्या व खाली असणारा जिल्हा निवडून तुम्हाला लॉगिन करायचे आहे
- लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज लोड होऊन उघडेल त्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला पर्याय दिसेल त्यामधील या ( Revenue Department)पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे
- Revenue Department या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज लोड होईल त्यामध्ये तुम्हाला असा Sub department पर्याय दिसेल तर त्याच्या पुढे असणाऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला हा revenue services पर्याय निवडायचा आहे
- यानंतर खाली तुमच्यासमोर नवीन पर्याय उघडतील त्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर ( non creamy layer) या पर्यायावर ती टिक करायचा आहे व proceed या बटणावरती क्लिक करायचं आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक पुन्हा नवीन पेज लोड होईल यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे दाखवण्यात येतील ती कागदपत्रे तुमच्याजवळ आहेत की नाही त्याची तुम्हाला सर्वप्रथम पूर्तता करून घ्यायची आहे
- यानंतर तुम्हाला त्या पेजला पूर्ण खाली पर्यंत स्क्रोल करायचा आहे आणि continue या बटनावर क्लिक करायच आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागेल त्यानंतर लागणारी कागदपत्रे देखील तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागतील तर ती कशी केली जातात या संबंधित तुम्ही युट्युब वरती प्रात्यक्षिक व्हिडिओ पाहू शकता
- अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईल द्वारे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट साठी अर्ज करू शकता व जर तुम्हाला अर्ज करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्र मध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये देखील जाऊन हे सर्टिफिकेट काढू शकता
डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रे | येथे क्लिक करा |
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
FAQ
नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय
खाजगी व सरकारी कामांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी काही प्रवर्गातील लोकांसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे दिले जाते ज्यामधून त्या लोकांना त्या प्रवर्गामध्ये सवलती मिळतात व त्याचे इतर लाभ देखील त्यांना प्राप्त होत
नॉन क्रिमिलियर या प्रवर्गात कोण मोडते
नॉन क्रिमिलियर या प्रवर्गामध्ये अशी लोकं मोडतात की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त असेल ती लोक या प्रवर्गात मोडतात
नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागते
मित्रांनो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे खालील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काढावे लागते NT,SBC,OBC इत्यादी