मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण व शहरी भागात दरवर्षी असंख्य विवाह होत असतात परंतु आपण पाहिले तर खास करून ग्रामीण भागात विवाह तर होते परंतु त्या विवाहाची नोंदणी होत नाही ज्यामुळे वधू-वरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे मिळत नाही ज्याचे नुकसान त्यांना भविष्यात खूप प्रमाणात होते त्यामुळे आज आपण माहिती घेणार आहोत की विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात व ती नोंदणी कशी केली जाते
मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड किंवा पॅन कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला
- रेशन कार्ड
- जन्माचा दाखला
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- प्रतिज्ञापत्र
- लग्न पत्रिका
- तीन साक्षीदार ओळखपत्र
मॅरेज सर्टिफिकेट कसे काढावे
- मित्रांनो मॅरेज सर्टिफिकेट हे दोन प्रकारे लोकांना काढता येते सर्वप्रथम जर तुमचा विवाह ग्रामीण भागात झाला असेल किंवा आपण ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुमचे मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत मार्फत काढले जाते व तुम्हाला ते दिले जाते
- यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये जर तुमचा विवाह हा शहरी भागात झाला असेल किंवा तुम्ही मूळचे शहरा मधिल रहिवासी असाल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा नागरी सुविधा केंद्रा मध्ये काढून मिळेल
- आणि यानंतर शेवटचे म्हणजे जर तुमचा विवाह एखाद्या मंदिरामध्ये किंवा ट्रस्ट मार्फत झाला असेल तर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र हे त्या ट्रस्ट मार्फत देखील दिले जाऊ शकते
- परंतु तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुमच्याकडे वरील कागदपत्रे व तीन साक्षीदार उमेदवार असायला हवेत तरच तुम्ही कायद्यानुसार विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढू शकता
मॅरेज सर्टिफिकेट फॉर्म कुठे मिळेल
मित्रांनो तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी फॉर्म दोन ठिकाणी मिळेल एक तर तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्हाला अर्ज हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिळेल
यानंतर दुसरे तुम्ही जर शहरी भागातील नागरिक किंवा रहिवासी असेल तर तुम्हाला अर्ज हा जवळच्या सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये किंवा नागरी सुविधा केंद्रा मध्ये मिळेल
मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी पात्रता काय आहे
मित्रांनो जर तुमचे लग्न झाले असेल किंवा तुम्ही एक नवीन वधू आणि वर असाल आणि तुम्हाला जर मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुम्ही खालील बाबींमध्ये पात्र असायला हवेत
- सर्वप्रथम तुम्ही जर नवीन वधू आणि वर असाल तर कायद्यानुसार वधूचे वय हे किमान 21 वर्षे पूर्ण असायला हवे व वधूचे वय हे 18 वर्षे पूर्ण असायला हवे
- यानंतर वधू आणि वर हे महाराष्ट्रातील किंवा भारतातील रहिवासी असायला हवेत
- यानंतर वधू आणि वराकडे वरील कागदपत्रे असायला हवीत
- यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी तिच्याजवळ तीन कमीत कमी साक्षीदार पाहिजेत
मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाइन
मित्रांनो जर तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाइन पद्धतीने जर काढायचे झाले तर तुम्हाला राज्य सरकारच्या या (aaplesarkar.maha. online.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन वरील कागदपत्रे अपलोड करून मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने काढता येईल
डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | येथे क्लिक करा |
FAQ
विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय
मित्रांनो 2006 या वर्षी सुप्रीम कोर्टाने महिलांच्या एक प्रकारे सुरक्षे करिता विवाह प्रमाणपत्र जाहीर केले यामध्ये लग्न झालेल्या वधू-वरांकडे जर विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तर ते वधू वर कायद्याने पती-पत्नी आहेत हे दाखवण्याचे काम मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र करते
मॅरेज सर्टिफिकेट कुठे मिळते
मित्रांनो तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट हे सरकारी कार्यालयांमध्ये मिळू शकते जसे की ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका कार्यालय,सरकारी दवाखाना,नागरिक सुविधा केंद्र अशा ठिकाणी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढून मिळूण शकते