कुक्कुटपालन व्यवसाय : महाराष्ट्र मध्ये अनेक तरुण वर्ग व शेतकरी वर्ग शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय हा करत असतो व त्यामधून त्यांना आर्थिक मदत देखील प्राप्त होते परंतु यावर्षी महाराष्ट्रातील असंख्य बाजारपेठांमध्ये कुक्कुट पक्षाचे दर हे खूप ढासळले आहेत ज्यामुळे कुकूटपालन व्यवसाय हा धोक्यात आला आहे
असे का तर बाजारपेठांमध्ये आता खूप साऱ्या या व्यवसायातील खाजगी कंपन्या या खूप सार्या जास्त वजनाच्या कुक्कुट पक्षांचा व्यापार बाजारपेठांमध्ये करत आहेत ज्यामुळे असंख्य पक्षांचा पुरवठा बाजारात आल्याने कुक्कुट पक्षांचे दर हे ढासळले आहेत ज्याचं नुकसान हे शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर होत आहेत
अनेक कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून असे सांगण्यात येत आहे की येत्या नवीन वर्षात महाराष्ट्र मध्ये सर्व बाजारपेठांमध्ये कुक्कुटपालनाचे दर हे 100 रुपये किलोच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतील. व दर हे त्याच्याखाली देखील पडू शकतात यावर्षी सांगण्यात येते की 65 रुपये किलो या भावाने कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना पक्ष्यांची विक्री करावी लागली, शेती पूरक व्यवसाय करणारे प्रत्यक शेतकरी आता अशा भावामुळे पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयावर आहे
पोल्ट्री व्यवसायावर सध्या बाजारपेठांमध्ये परिपूर्ण असलेल्या कंपन्यांनी नियंत्रण मिळवले आहे ज्यामुळे त्याचे नुकसान शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या तरुणांवर होत आहे कंपन्यांनी याची जागा खूप मोठ्या प्रमाणात घेतले आहे यामुळे त्यांचे उत्पादन देखील त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात होत आहे असंख्य यंत्रे व खाद्यांचा वापर करून ते पंधरा ते वीस दिवसात खूप मोठे उत्पादन तयार करतात व ते बाजारपेठांमध्ये कमी दारात विक्रीसाठी आणतात ज्याचं नुकसान शेतकऱ्यावर होत आहे
कुक्कुटपालन पोल्ट्री व्यवसाया मध्ये व्यावसायिकाला 40 रुपयाला पक्षी खरेदी करावा लागतो व तो पक्षी वाढवण्यापर्यंत त्या पक्षावर 90रुपयांचा खर्च होतो व तो पक्षी बाजारपेठांमध्ये आत्ताच्या घडीला 65 रुपये या भावाने जात आहे ज्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे व हा व्यवसाय बंद करण्याचा खूप साऱ्या तरुणांनी निर्णय घेतला आहे